वडसा मॅरेथॉन मध्ये पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चे विद्यार्थी चमकले

Tue 13-May-2025,02:29 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी - विभा बोबाटे गडचिरोली 

ब्रम्हपुरी :- मागील ८ वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी तर्फे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक प्रशिक्षण देऊन विविध स्पर्धाच्या माध्यमातून ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात घळवून ब्रह्मपुरी शहराचे नाव लौकिक करणाऱ्या पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रह्मपुरी च्या विद्यार्थ्यांनी दिनांक १२ मे २०२५ सोमवार ला सकाळी ८:०० वाजता बुद्ध पौर्णिमेनिमित्त जुनी वडसा येथे संबोधी बुद्ध विहार व विजय गेम क्लब ,वडसा यांच्या संयुक्त विद्यमानेआयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवित ४ गोल्ड २ सिल्वर तर १ ब्राँझ मेडल मिळविला ज्यामध्ये १० वर्षातील मुलांच्या १ किमी. दौड स्पर्धेत कु. अर्पित हिवराज सोमनकार याने प्रथम क्रमांक तर कु. वेद प्रदीप ठेंगरी याने दुतिय क्रमांक तर कु.निर्मित राहुल भोयर याने तृतिय क्रमांक पटकाविला तर १० वर्षातील मुलींच्या १ किमी. दौड स्पर्धेत कुमारी. आरुषी होमराज फटिंग हीने प्रथम क्रमांक पटकावला तर १४ वर्षातील मुलींच्या २ किमी. दौड स्पर्धेत कुमारी. मानसी शेखर फटिंग प्रथम कुमारी. श्वेता विष्णू पिल्लारे द्वितीय क्रमांक पटकाविला तसेच १६ वर्षातील मुलींच्या ३ किमी. दौड स्पर्धेत कुमारी. समीक्षा हीरालाल राऊत हिणे प्रथम क्रमांक पटकावला विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाची श्रेय पालक व पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरीचे संचालक राहुल जुआरे सर यांना दिले.