मोहटोळ जमा करणे बेतले जिवावर वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार
 
                                    
                                जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- वडधा गावाला लागून असलेल्या जंगल परिसरात मोहटोळ वेचण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना गुरुवारी (दि.5) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास कक्ष क्रमांक 10 मध्ये घडली. मिराबाई आत्माराम कोवे (77, रा. सुवर्णनगर देलोडा) असे मृत महिलेचे नाव आहे.वडधा जंगल परिसरामध्ये कोणतेही कामधंदे नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजी रोटीच्या भरवशावर वडधा-पोर्ला मार्गावर जंगली प्राण्यांची दहशत वडधा पोर्ला मार्गावर मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहतूक असते. अशातच भर दुपारीच रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. असे असतानाच आता वाघाने हल्ला करून महिलेला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने जंगली हत्ती व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.अवलंबून राहावे लागते. मिराबाई कोवे या वृद्ध महिलेला काम करणे शक्य होत नसल्याने गावाला लागूनच असलेल्या जंगल परसरात त्या गुरुवारी सकाळच्या सुमारास मोहटोळ जमा करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, मोहटोळ वेचत असतान जंगलात प्रवेश करू नका, वनविभागाचे आवाहन पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडधा, बोडधा.देलोडा, चुरचुरा, नवरगाव, कुन्हाडी, महादवाडी, गोगाव आणि अडपल्ली येथील नागरिकांनी जंगलात प्रवेश करू नये. जंगलात वाघ, अस्वल, हत्तीचे वास्तव्य आहे. सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. काही अनुचित प्रकार घडल्यास वनविभागाला त्वरित कळवावे, असे आवाहन पोर्ला वनविभागाने केले आहे.दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            