महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनच्या चेअरमनपदी डॉ. एस.नारायण मूर्ती
प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-प्रताप मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट गोंदिया द्वारा संचलित शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथील प्राचार्य डॉ. एस. नारायण मूर्ती यांची नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने महाराष्ट्र अमेचर नेटबॉल असोसिएशन च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली.त्यांची ही झालेली निवड हे महाविद्यालयाच्या दृष्टीने खूप मोठे यश मानले जात आहे. यापुढे सालेकसा व आसपासचे ग्रामीण भागातील विद्यार्थी हे आपले भविष्य या खेळाच्या माध्यमाने घडवू शकतात. डॉ मूर्ती यांची निवड त्यांनी आज पर्यंत खेळामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल झाली असून ते स्वतः हाडाचे खेळाडू आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक गोपालदास अग्रवाल अध्यक्ष विशाल अग्रवाल व सचिव प्रफुल अग्रवाल सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप अभिनंदन केले.
Related News
मूर्तीजापूर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नचिकेत बोटकुलेची कांस्यपदकावर मोहोर
6 days ago | Naved Pathan
मास्टर सोमनाथ हेगु यांच्या कराटे क्लास मधील विद्यार्थ्यांनी 32 मेडलची कमाई करत मारली बाजी
8 days ago | Sajid Pathan