पादरी चे सैराट करणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस गोपीचंद पडळकर यांचे ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात वादग्रस्त विधान.

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
कोल्हापूर : येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्म गुरु विरोधात केली आहे. त्यांच्या या विरोधा मुळे ख्रिश्चन धर्मामध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे याप्रकरणी ख्रिश्चन धर्मासाठी सोमवारी कलेक्टर ऑफिस येथे बहुजन पँथर सेनेने निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.सांगली येथील यशवंत नगर येथे गत आठवड्यात सासरच्या छ ळाला कंटाळून ऋतुजा राजगे नामक सात महिन्याच्या गरोदर महिलेने आत्महत्या केली होती.नंतर ही घटना धर्मांतराच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले होते.याप्रकरणी टीका करताना गोपीचंद पडळकर यांचे ख्रिचन धर्म गुरु विरोधात वादग्रस्त विधान केले होते त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत.पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन पँथर सेने मार्फत करण्यात आली.सरकारने गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर याप्रकरणी तीव्र मोर्चे काढले जातील असा इशारा बहुजन पँथर सेनेने दिला.
पडळकर काय म्हणाले ?
आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीर्साठी जसे बक्षीस ठेवले जाते तसेच बक्षीस धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना मारण्यासाठी ठेवले पाहिजे.पहिल्या पादरी मारणाऱ्याला पाच लाख दुसऱ्या पादरीस मारण्यासाठी चार लाख तिसऱ्या पादरीस मारण्यासाठी तीन लाख व जो कोणी पादरी चा सैराट करेल त्याला अकरा लाख बक्षीस ठेवले पाहिजे.वादग्रस्त विधानामुळे ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या आहेत.पडळकर यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर खटला चालवावा अशी मागणी बहुजन पँथर सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटने कडून व कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम ख्रिचन समाजाकडून केली आहे.या मोर्चामध्ये सहभागी संस्थापक अध्यक्ष बहुजन पँथर सेना निशा बचुटे. पश्चिम महाराष्ट्र संघटक बिपिन जोसेफ खिल्लारे राष्ट्रीय अध्यक्ष भारत गोंधळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील कांबळे. प्रवीण जाधव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खेरमोडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजू अवघडे बापू आवळे. शिये शाखा अध्यक्ष वैभव शिर्के व परविन खांडेकर . जालिंदर वाघमारे संस्थेचे सचिव आणि इतर सर्व बहुजन पँथरचे सर्व पदाधिकारी शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ख्रिश्चन बांधवहे सर्व निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते.