गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाचा मृत्यू

Fri 18-Jul-2025,09:05 PM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली 

समधीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावे अन्यथा उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा दिलीप घोडाम यांनी दिला.

आरमोरी - आरमोरीतालुक्यातील जोगीसाखरा येथील रहिवासी सुनंदा शामराव पेदाम यांची तब्येत अचानक बिघडल्याने गडचिरोलीला 12 जुलैला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु रुग्णालयातील कर्तव्यावर असलेलें वैद्यकीय अधिकारी यांनी थातुरमातुर उपचार करून रुग्णाला रक्त कमी आहे अर्जंट रक्ताची सोय करा असे सांगताच सकाळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी दि 13 ला रक्त पेढीचे वैद्यकीय अधिकारी शाहू यांना फोन करून रक्त 11 वाजता उपलब्ध करून दिला. परंतु रक्त पेढी मधुन रक्त वार्डातील कर्मचाऱ्यांनी आनुन लावलेच नसल्यामुळे त्या महीला रुग्णांच्या दुपारी 2.30 वाजता मृत्यू झाला परंतु रक्त तेथेच पडुन होता. या विषयी विचारना केली असता आम्हच्या कडे रक्त आनण्यासाठी माणस नाही असे उदष्ट शव्दात नातेवाईकाना सुनावले जाते प्रशासनाला सांगा माणसे वाढवायला असे मृत्यू झाल्यावर उदष्ट बोलले जाते यासह असे प्रसंग बरेच रुग्णाना आले असल्यामुळे बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावे अन्यथा उपोषणाला बसण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम व शामराव पेन्दाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.