पिंपळखुटा (लहान) शेतशिवारात वीज पडून 52 वर्षीय शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू

Sat 19-Jul-2025,11:10 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी गजानन (गजु) ढोके अमरावती

अमरावती:मोर्शी तालुक्यातील निंभी येथील शेतकरी मधुकर मुकुटराव पैठणकर वय 52 वर्ष यांचे वडिलोपार्जित पाच एकर शेत पिंपळखुटा लहान शेत शिवारात आहे. शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी नेहमीप्रमाणे मधुकरराव पैठणकर आपल्या शेतशिवारात शेतीच्या कामाकरिता गेले असता दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास आकाशात ढगे निर्माण होऊन विजेच्या कळकटासह पाऊस सुरू झाला होता.याच वेळी शेतकरी मधुकर यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा शेतातच मृत्यू झाला. सायंकाळ झाली असता मधुकरराव घरी परत न आल्यामुळे त्यांचा पुतण्या संदीत राजू पैठणकर हा शेतात पाहण्याकरिता गेला असता शेतात मृत अवस्थेत काका मधुकरराव दिसून आले. सदर घटनेची माहिती संदीत याने निंभी येथील महिला पोलीस पाटील सविता राऊत यांना दिली. पोलीस पाटील सविता राऊत यांनी सदरची माहिती शिरखेड पोलीस स्टेशनला तसेच मोर्शी येथील महसूल विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस पथक व तलाठी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रात्री साडे आठ ते नऊ वाजता च्या दरम्यान शवविच्छेदना साठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शनिवार दिनांक 19 जुलै रोजी मृतदेहांवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय सदर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. निंभी येथील शोकाकुल वातावरणात मृतक मधुकर पैठणकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. शिरखेड पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शिरखेड पोलीस करीत आहे.