२.२६७ किलो गांजासह एकाला अटक बल्लारपूर पोलिसांची कारवाई

Sat 26-Jul-2025,11:44 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:बल्लारपूर पोलीसांनी प्रजापती चौक, सुभाष वॉर्ड परिसरात छापा टाकून २.२६७ किलो गांजा जप्त केला असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे रु. २७,२०४/- किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. अरबाज शफी खान (२४) असे आरोपींचे नाव आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पार पडली. त्यांनी सदर माहिती पोनि बिपीन इंगळे यांना कळवली. बल्लारपूर पोलीसांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथक तयार करण्यात आले.मुखबिराच्या दिलेल्या माहितीनुसार आरोपी अरबाज शफी खान (२४) रा. प्रजापती चौक, सुभाष वॉर्ड, बल्लारपूर याच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीमध्ये २.२६७ कि.ग्रॅम ओलसर गांजा आढळून आला. तपासात तो कॅनाबिस वनस्पती (गांजा) असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम-८ (क), २०(ब), ii (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बिपीन इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, सफौ. आनंद परचाके रणविजय ठाकुर, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, भास्कर चिचवलकर, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, विकास जुमनाके सचिन अलेवार, सचिन राठोड, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक ग्रेडपोउपनि भास्कर कुंदावार इत्यादी पो. स्टाफ यांनी केले असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जनगंमवार करीत आहेत.