आरमोरीत हिरो शोरूम मध्ये ईमारत कोसळून अपघातात तिघांचा मृत्यू , तिघे गंभीर जखमी
Fri 08-Aug-2025,08:45 AM IST -07:00

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी :- आरमोरी येथील लालानी यांची हिरो मोटर शोरूमची मागील जुनी भिंत पडून तीन ठार तर तीन गंभीर जखमी ,जखमींना आरमोरी येथिल सरकारीउप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.लालानी यांची शोरूम ही भगतसिंग चौकात राष्ट्रीय महामार्गाला लागूनच आहे आणि ती पूर्ण अजरणी अवस्थेत असलेली इमारत आहे.आज दुपारला साडेचार च्या वाजता शोरूमची मागील भिंतकोसळून तिघे मरण पावले. मृतकामध्ये आकाश ज्ञानेश्वर बुरांडे राहणार नीलज तालुका ब्रह्मपुरी वय 30, इसराइल शेख राहणार वडसा देसाईगंज वय 32 वर्ष, अकसन शेख राहणार देसाईगंज वय 32,जखमी विलास कवडू मने ,आरमोरी वय 50, सौरभ रवींद्र चौधरी राहणार मेंडंकी की तालुका ब्रह्मपुर जिल्हाा चंद्रपूर वय 34, दीपक अशोक मेश्राम राहणार आरमोरी वय 23 वर्षे असे आहे