बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशन ने अनोख्या पद्धतीने साजरा केला जागतिक छायाचित्रकार दिन

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर
बल्लारपूर :बल्लारपूर तालुक्यत जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधत बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशनतर्फे यंदा हा दिवस एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. छायाचित्रकार दिनानिमित्त केवळ कार्यक्रमापुरता उत्सव न मानता समाजासाठी उपयोगी ठरणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा असोसिएशनने जपली असून, यंदा शहरातील रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एम्बुलेंस चालक व एम्बुलेंस डॉक्टरांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.हा भव्य कार्यक्रम शहराच्या नगर पकिला चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील सर्वच फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.एम्बुलेंस चालकांचे योगदान अधोरेखित एम्बुलेंस चालक हे रुग्णवाहिकेतील ‘अनामिक हिरो’ असून ते २४ तास रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज असतात.अपघात असो की आकस्मिक आजार, त्यांना कोणतीही वेळ, हवामान किंवा परिस्थिती थांबवू शकत नाही. त्यांच्या तत्परतेमुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले आहेत. म्हणूनच त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.असोसिएशनची परंपरा कायम बल्लारपूर फोटोग्राफर असोसिएशन दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रकार दिन विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करत आली आहे. छायाचित्रण या कलाक्षेत्राबरोबरच समाजाशी निगडीत जबाबदारी पार पाडण्याचे उदाहरण असोसिएशनने या उपक्रमाद्वारे दाखवून दिले आहे.या उपक्रमामुळे एम्बुलेंस चालकांच्या कार्याला मिळालेले प्रोत्साहन आणि छायाचित्रकारांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी हे दोन्ही पैलू नागरिकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहतील.