बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांसाठी समस्या निवारण शिबिर संपन्न

Fri 29-Aug-2025,10:08 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:२९ ऑगस्ट, २०२५: आम आदमी पार्टीच्या मागणीनुसार, बल्लारपूर तहसील कार्यालयात निराधार लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार रेणुका कोकाटे आणि नायब तहसीलदार महेंद्र फुलझले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात, विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना येत असलेल्या अडचणी सोडवण्यात आल्या. आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात बँक सीडिंग, मोबाईल नंबर मॅपिंग, हयात अपडेट आणि आधार कार्ड अपडेट यांसारख्या तांत्रिक समस्यांमुळे खात्यात पैसे जमा न होणाऱ्या जवळपास २०० लाभार्थ्यांना मदत करण्यात आली. या कामासाठी आम आदमी पक्षाचे अफजल अली, सलमा सिद्दिकी, स्नेहा गौर, हर्षद खंडागडे आणि रेखा भोगे यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आयटी असिस्टंट बेबी दसेरिया, तसेच सेतू संचालक सचिन नाईक (स्वरा कॅफे, बल्लारपूर), दीपक मांदाणे (कमल ग्राफिक्स, बल्लारपूर), नितीन रायपुरे (आस्था सेतू, कोठारी), आनंद दुबे (मनीषानंद सेतू, विसापूर) आणि खलील खान (बल्लारपूर) यांनी मोलाचे सहकार्य केले.शिबिराच्या शेवटी,आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, आणि शिबिरात सहकार्य करणाऱ्या सर्व सेतू संचालकांचे आभार मानले. हे शिबिर सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आणि अनेक लाभार्थ्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवल्या गेल्या.