वसमत तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत श्रीनिवास कनिष्ठ महाविद्यालय चा प्रथम क्रमांक

Thu 04-Sep-2025,07:40 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:वसमत येथे आज दिनांक 04 /09 /2025 रोजी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वसमत या ठिकाणी घेण्यात आलेल्या . तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा मध्ये श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत च्या 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने सहभाग घेऊन मुलांच्या गटातून तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे या विजयी संघाचे जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. उपस्थित मान्यवर स्पर्धेत प्रोत्साहन देताना हिंगोली जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय राजेश्वर मारावार. तालुका क्रीडा अधिकारी डॉ. निळकंठ श्रावण,जिल्हा सचिव अजगर पटेल, मुख्याध्यापक मस्के सर,विजय गव्हाणे सर, विश्वास वायचळ सर ,गणपत नरवाडे सर, शाम बागल सर, यांनी स्पर्धेतील खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर विजयी खेळाडू (प्रेम विलास पानपट्टे, शहा रेहान रशीद,हर्षल मिलिंद आळसपुरे,सय्यद फैजान सय्यद अन्वर,गौरव नागोराव गायकवाड, कृष्णा लक्ष्मण गायकवाड,सय्यद रेहान सय्यद मुर्तुझा,शेख आयन सादिक, रेहान मोहसीन शेख,समर्थ अशोक पवार,अर्थ शेखर जैस्वाल,पठाण काशीफखान हबीबखान,अयान अली सय्यद एजाज अली,पांचाळ ओमकार नारायण,पठाण रेहान खान ईशरत खान,कुरेशी फरहान जमीर अ.कुरेशी, शेख रजा अहेमद शेख शाहेद अहेमद,पठाण अयान सिबगतुल्लाह खान) या सर्वांना,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा गणेश कमळू सर, सचिव.आरती गणेश कमळू, गौरव गणेश कमळू, अरुण कमळू सर, प्राचार्य श्रीधर लोखंडे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.