ग्रामपंचायत नानव्हा येथे आता तिसऱ्या डोळ्याची नजर

Sun 09-Nov-2025,11:12 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा 

सालेकसा-गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीच्या घटनांवर वचक ठेवण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने आवारात सीसीटीव्ही बसविले आहेत. विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते.

गावामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे संपूर्ण चित्रीकरण ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या स्क्रीनवरती दिसणार आहे. गावातील प्रत्येक हालचालींवर आता ग्रामपंचायतीचे नियंत्रण असणार आहे.

नानव्हा गावातले सीसीटीव्ही आज गावची दृष्टी बनले आहे. गावात प्रवेश करणारे, ये-जा करणारी वाहने, फेरीवाले, भंगारवाले, भाजीवाले, सेल्समन ,गुन्हेगारी आदी व्यक्तींच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयातून करडी नजर असणार आहे.

चोरी, टवाळखोरी, बेकायदेशीर गोष्टी, चांगलाच आळा बसणार आहे. जणू गावालाच तिसरा डोळा आला आहे. यापुढे कोणतेही गैरकृत्य लपणार नाही.

ग्रामपंचायत नानव्हा अंतर्गत येणारे नानव्हा,घोन्सी व भन्सुला परिसरातून अनेक वाहनांची वर्दळ असते. दरम्यान काही गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. 

ग्रामपंचायत,येथील मुख्य ठिकाणी‌ सीसीटीव्ही बसविण्यात आले. दरम्यान भविष्यात गावातील इतर प्रमुख भागांतही सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत.

बॉक्स 

"गावातील नागरिकांची सुरक्षितता तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी सीसीटीव्हीची अत्यंत गरज होती. त्याच पार्श्वभूमीवर गावातील चौपाटीच्या मुख्य आवारात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक हालचालीवर करडी नजर असेल." 

- गौरीशंकर बिसेन, सरपंच नानव्हा