विकसित भारत 2047 कडे ग्रामीण भारताची ऐतिहासिक झेप,VB–G RAM G आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा वर्धा भारत सरकारने सादर केलेले VB–G RAM G (विकसित भारत – रोजगार व उपजीविका हमी अभियान – ग्रामीण) या विषयावर भारतीय जनता पक्ष कार्यालया त नुकतीच पत्रकार परिषद पार पडली यावेळी VB G RAM G च्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्य पदी देवळीचे आमदार राजेश बकाने यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. हे विधेयक ग्रामीण भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरत असून, रोजगार, पायाभूत सुविधा आणि उपजीविकेच्या संधींमध्ये मोठा बदल घडवणारे आहे. असे वर्धेचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल मानले जात आहे. या नव्या कायद्यामुळे ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी व मागास घटकांना सन्मानजनक रोजगाराची हमी मिळणार आहे.
याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 125 दिवसांचा रोजगार आता मिळणार आहे. तर अनुसूचित जमाती (ST) कामगारांना 25 दिवसांचा अतिरिक्त रोजगार मिळणार आहे. यात संपूर्ण मजुरीचे थेट व जलद पेमेंट गतिमान प्रणालीने करण्यात येणार आहे. पेरणी व कापणीच्या काळात मजुरांची कमतरता टाळण्यासाठी 60 दिवस काम स्थगिती करण्याचे देखील निर्णय या योजनेत घेण्यात आले आहे. यात उपजीविकेशी निगडीत व शाश्वत कामांवर भर पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
VB–G RAM G ही योजना केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून, ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक पारदर्शक बनवण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या रिअल-टाइम डेटा अपलोड करणे,
GPS व मोबाईल मॉनिटरिंग करणे,
AI च्या माध्यमातून फसवणूक ओळख करणे, योग्य लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची व्यवस्था करणे, यामुळे ही योजना प्रभावी, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख ठरणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीकारण करण्यासाठी पाणी, रस्ते आणि उपजीविका
नव्या कायद्यात ग्रामीण विकासासाठी चार प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत.
यामध्ये पाणीविषयक कामे व जलसंधारण,
कोअर ग्रामीण पायाभूत सुविधांची उभारणी,
उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा,
हवामान बदलामुळे येणाऱ्या अडचणींवर मात,
या माध्यमातून शेतीवरील ताण कमी होणार असून, ग्रामीण उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे.
नेतृत्वाची प्रतिक्रिया
प्रदेश समिती सदस्य व आमदार राजेश बकाने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“VB–G RAM G ही केवळ योजना नसून ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणाचा मजबूत पाया आहे. रोजगारासोबत सन्मान, पारदर्शकता आणि विकास यांचा समतोल या विधेयकात दिसून येतो.”
तर पालकमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले,
“विकसित भारत 2047 या स्वप्नाकडे नेणारे हे विधेयक ग्रामीण तरुणांसाठी नवी आशा निर्माण करणारे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी ही याची सर्वात मोठी ताकद आहे.”
ग्रामीण भारताचा आत्मविश्वास, विकसित भारताची ओळख
VB–G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भारत आत्मनिर्भर, सक्षम आणि भविष्याभिमुख होणार असून, नावापेक्षा कामाला प्राधान्य देणाऱ्या शासनाच्या धोरणाचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे. ग्रामीण विकासाच्या या नव्या पर्वाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्यासोबत माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, सुनील गफाट, आकाश पोहाने, उपस्थित होते