श्रद्धानंद प्राथमिक शाळेत ईद मिलन उत्साहात; सर्वधर्म समभावाचा संदेश

Mon 30-Mar-2026,08:48 AM IST -07:00
Beach Activities

श्रद्धानंद प्राथमिक शाळेत ईद मिलन उत्साहात; सर्वधर्म समभावाचा संदेश

हिंगणघाट | अब्दुल कदीर बक्श 

हिंगणघाट नगरपरिषदेच्या श्रद्धानंद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यां, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ईद मिलन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेत एकता, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेत सर्व धर्मांचे सण समान भावनेने साजरे करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रेम, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचे संस्कार दिले. वक्त्यांनी सांगितले की, बालवयात रुजवलेले सौहार्दाचे संस्कार भविष्यात समाजात एकता आणि शांतता प्रस्थापित करतात.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव जपण्याचे आवाहन केले. असे उपक्रम समाजाला जोडणारे असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नगर परिषद अध्यक्षा सौ. नयना तुडस्कर, शिक्षण सभापती सौ. पल्लवी बाराहाते, नगरसेविका सौ. शीतल मोहता, डॉ. अशोक मुखी, शाकिर खान पठाण, कटारिया, पप्पू मोहता, अकरम दोषी, मजाज कुरेशी, मोहम्मद मकसूद, मोहम्मद रियाज (गुड्डू मौलाना) आणि आसिफ सोलंकी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रेमकुमार पालीवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अब्दुल कदीर बख्श यांनी केले, तर आभार प्रदर्शन पालीवाल यांनी केले.

हा कार्यक्रम एकता, प्रेम आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.