वसमत शहरातील अनियमित वीजपुरवठा त्वरित सुरळीत करा,अन्यथा जण आंदोलन उभारु,वसमत व्यापारी व पत्रकारांचा इशारा

Fri 03-Apr-2026,02:04 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत भर उन्हाळ्यात वसमत शहरात विजेचा होत असलेला अनियमित पुरवठया मुळे वीज ग्राहक,व्यापारी, सामान्य जनता त्रस्त झाली असून वीज वितरण विभागाने आवश्यक उपाय योजना करुन 

त्वरित सुरळीत विज पुरवठा करुन कायम तोडगा काढावा

अन्यथा जण आंदोलन उभारण्याचा इशारा वसमत व्यापारी महासंघ व पत्रकार संघाने दिला आहे. 

मागील अनेक दिवसापासून शहरात सतत अनियमित वीजपुरवठा,डीपी जळणे,तारा तुटणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, तक्रार निवारण केंद्र फ्युज कॉलची सेवा देणारा क्रमांक नेहमी बंद राहणे किंवा अन्य नंबर वर फॉरवर्ड करण्याचे प्रकार वाढल्याने भर उन्हाळ्यात वीज ग्राहक,सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मुळे वसमत शहरवास्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत असून वीज वितरण कंपनी विरुद्ध रोष निर्माण होत आहे.

या संदर्भात वसमत तालुका व्यापारी महासंघ व वसमत तालुका पत्रकार संघ यांनी गुरुवारी तहसीलदार वसमत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून महावितरणाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचत अनियमित वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा व यावर कायम तोडगा काढण्याची लेखी मागणी केली.

 या वर तहसीलदार शारदा दळवी यांनी वीज वितरण विभागाचे अभियंता नंद यांना फोन करून सदर निवेदनावर तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या वर अभियंता नंद यांनी आठ दिवसात सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन तहसीलदार मॅडम यांना दिल्याने आठ दिवसात आपल्या समस्यांचे निवारण होईल अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

आगामी आठ दिवसात तात्काळ उपायोजना होऊन कायम तोडगा न निघाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. 

निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु, पत्रकार संघांचे अध्यक्ष फेरोज शफीउल्लाखा पठाण,व्यापारी मन्मथ अप्पा बेले,बाळासाहेब महागावकर,दीपक कुलथे,महादेव कापुसकरी,वसंत चेपूरवार,नामपल्ली,

पत्रकार रामू चव्हाण, नासर पठाण, हरणामसिंग चव्हाण, शेख अफसर,शरीफ आलम,शेख इलयास,अय्युब पठाण, श्रीधर वाळवंटे,शेख इलयास,नवीद अहेमद, मोईन कादरी,नंदू परदेशी,बालाजी अडकीने,शेख युनूस,नागेश चव्हाण, मुनीरोद्दीन फारुखी आदी सह व्यापारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.