संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

Sun 12-Apr-2026,07:48 AM IST -07:00
Beach Activities

संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

प्रतिनिधी : शैलेश झाडे, समुद्रपूर

समुद्रपूर : हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दि. ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान हा सोहळा पार पडत असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

“दुःखींतांचा हरी भोजाजी माऊली” अशी ख्याती असलेल्या संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी परंपरेनुसार भव्य भजन-दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ५०० दिंड्या सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संत भोजाजी महाराजांचा महिमा विदर्भासह देश-विदेशातही पोहोचला असून त्यांच्या कार्यामुळे अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.

दि. १४ एप्रिल रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून “सर्व धर्म समभाव” हा संदेश जपत सर्व जाती-धर्मातील भाविक या कार्यक्रमात सहभागी होतात.