उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवावे:- इमरान राही

Tue 12-May-2026,01:42 AM IST -07:00
Beach Activities

उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवावे:- इमरान राही

 

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे हे आजच्या स्पर्धात्मक युगात उज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. उच्च शिक्षणामुळे केवळ नौकरीची संधी मिळत नाही, तर वैयक्तिक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे व्दार ही खुले होतात.

उच्च शिक्षामुळे समाजात सन्मान मिळतो आणि एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होते. सुशिक्षित तरूण हेच राष्ट्राचे खरे आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवावे असे मत ज्येष्ठ साहित्यकार इमरान राही यांनी व्यक्त केले.

ते १० मे रोजी नंदकिशोर बोबडे यांच्या निवसस्थानी त्यांची मुलगी संस्कृती बोबडे यांचा अभिनंदन सोहळया प्रसंगी ऐका छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख अथिती म्हणून बोलत होते. नुकतेच संपन्न झालेल्या बारावी परिक्षेत संस्कृती बोंबडे यांनी जी.एस. कॉमस कॉलेज वर्धा येथून ९१% गुण प्राप्त करून मॅरीट मध्ये स्थान प्राप्त केले. कु. संस्कृती बोबडे १०वी ची परिक्षा सुध्दा मॅरीट मध्ये उत्तीर्ण झाली आहे.

 

पाहुण्यांच्या हस्ते कु. संस्कृती बोबडे हीचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी प्राचार्य रमेश निमसडकर, जगजीवनराम शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर उईके, आदर्श शिक्षक सुनिल बाभळे, महेश मसराम, मिलिंद मुन, नंदकिशोर बोबडे, अश्वीनी बोबडे आदी मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते. प्रस्तावना रमेश निमसडकर, संचालन महेश मसराम तर आभार मिलिंद मुल यांनी मानले. भविष्यात भारतीय प्रशासकिय सेवा या परिक्षेत उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करील असे मत कु. संस्कृती बोबडे यांनी आपल्या मनोगतातून नमुद केले. कार्यक्रमात्न अनेक मान्यवर उपस्थित होते.