“भुगावमध्ये नेमकं काय घडलं? युवकावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न, मारहाणीचा संशय आणि पोलिसांत नोंदच नाही!”
“भुगावमध्ये नेमकं काय घडलं? युवकावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न, मारहाणीचा संशय आणि पोलिसांत नोंदच नाही!”
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन व्हिडिओंमुळे या प्रकरणाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहिल्या व्हिडिओमध्ये एक युवक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोच युवक नग्न अवस्थेत अंगावर केवळ कंबळ ओढून जमिनीवर बसलेला दिसतो. त्या ठिकाणी उपस्थित असलेली एक युवती त्याला रागावून बोलताना ऐकू येते, तर काहीजण व्हिडिओ शूट करत शिवीगाळ करत असल्याचंही दिसत आहे.
या संपूर्ण प्रकारामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रकरण प्रेमसंबंधातून घडल्याची चर्चा रंगली आहे. HT NEWS च्या टीमने भुगाव येथे जाऊन घटनास्थळी विचारपूस केली असता, संबंधित युवक हा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून ट्रक चालक असल्याची माहिती समोर आली. तसेच त्याला मारहाण करण्यात आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र इतका गंभीर प्रकार घडूनही सावंगी पोलीस ठाण्यात या घटनेची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित युवकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं की नाही? तो सध्या जिवंत आहे की मृत? याबाबतही स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
व्हायरल व्हिडिओतील दृश्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, HT NEWS या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या घटनेमागचं सत्य आणि सर्व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं लवकरच जनतेसमोर आणणार