इंदिरा गांधी विद्यालयाचा दहावीचा निकाल उज्ज्वल
इंदिरा गांधी विद्यालयाचा दहावीचा निकाल उज्ज्वल,गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार उत्साहात
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे
अल्लीपूर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला असून, अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल ८७.१६ टक्के लागला आहे. यामध्ये कु. विभा शंकर गवार्ले हिने ८५.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. विभूती मोहन लीचडे आणि चि. देवांशू सतीश सुपारे यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. श्रद्धा प्रताप थूल हिने ७६.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा प्राचार्या अर्चना मुडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वामनराव खोडे, सचिव योगेश खोडे तसेच पर्यवेक्षक नरेश येडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्या व शिक्षकांना दिले.