स्व-गणनेत सहभागी व्हा - मायनॉरिटी वेलफेयर असोसिएशन, वर्धा यांचे आवाहन
स्व-गणनेत सहभागी व्हा - मायनॉरिटी वेलफेयर असोसिएशन, वर्धा यांचे आवाहन
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा वर्धा : देशाच्या १६ व्या जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिला टप्पा दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्व-गणना (Self Enumeration) या डिजिटल माध्यमातून थेट सहभाग नोंदवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मायनॉरिटी वेलफेयर असोसिएशन, वर्धा यांच्या वतीने नागरिकांना स्व-गणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून आपली माहिती स्वतः भरावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष इकराम हुसेन शेख यांनी केले आहे.
यावेळी सय्यद मतीन, एझाज मोहम्मद, अमीनउद्दीन शेख, मुबीन शेख, समीन खान, ईद्रीस मेमन, महेबूब बनानी, जुनेद शेख, अख्तर खान तसेच प्रा. डॉ. अनिस बेग (जिल्हाध्यक्ष, महा मायनॉरिटी एनजीओ फोरम) यांनीही नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
स्व-गणना ही केवळ वैयक्तिक माहिती नोंदवण्याची प्रक्रिया नसून देशाच्या नियोजन, विकास आणि संसाधनांच्या योग्य वाटपासाठी अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे सर्व नागरिकांनी या डिजिटल उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
“आपली नोंदणी करा, आपला सहभाग नोंदवा आणि राष्ट्रनिर्मितीत हातभार लावा,” असा संदेशही संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.