चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस मरेपर्यंत फाशी द्यावी
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
अखिल भारतीय ब्राह्मण महासभेची मागणी
हिंगोली :वसमत पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासभा, शाखा वसमत यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या संतापजनक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, संबंधित आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबतचे निवेदन बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून,भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत या साठी कडक कायदे आणि त्यांच्या प्रभावी अंमल बजावणीची आवश्यकता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर आनंद बाबुराव औसेकर,रवी बडवणे,अनिल सुधाकरराव देशपांडे,सुनील दत्तोपंत कवठेकर, अविनाश श्रीनिवास गिरगावकर, प्रकाश माणिकराव कहात सह असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत