सीआयएसएफमध्ये रुजू होणाऱ्या कु. श्रावणी गुरनुले यांचा सत्कार

Tue 02-Jun-2026,06:19 AM IST -07:00
Beach Activities

सीआयएसएफमध्ये रुजू होणाऱ्या कु. श्रावणी गुरनुले यांचा सत्कार

हिंगणघाट | प्रतिनिधी : निखिल ठाकरे

हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील रहिवासी तथा सामान्य कुटुंबातील कु. श्रावणी अनिलराव गुरनुले यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये निवड झाली असून त्या ६ जून रोजी सेवेत रुजू होणार आहेत. यानिमित्ताने पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट तसेच माजी पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

यावेळी श्रीमती शालिनी चांभारे यांच्या हस्ते कु. श्रावणी गुरनुले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात नगरसेवक सूरज कुबडे, समाजसेवक प्रशांत लोणकर तसेच माजी पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाटचे अध्यक्ष विवेक भगत यांनी मार्गदर्शन करताना श्रावणी यांच्या यशाचे कौतुक केले आणि तरुणींनी विविध क्षेत्रांत पुढे येऊन देशसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाटचे संस्थापक दिनेश नरड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रुपचे अध्यक्ष अमोल पवार यांनी मानले.

सत्कार समारंभाला रवींद्र नौकरकार, प्रभाकर पाटील, शेख अख्तर, जानरावजी चांभारे, पुरुषोत्तम उईके, राजू साटोने, अशोक खोडे, अशोक थूल, बंडूजी चौधरी, भारत फुलकर, सुनील दिवे यांच्यासह ग्रुपचे माजी सैनिक आणि संत ज्ञानेश्वर वॉर्डमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.