रामनगर पोलिसांची दारूबंदीविरोधात धडक कारवाई; १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
रामनगर पोलिसांची दारूबंदीविरोधात धडक कारवाई; १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
वर्धा शहरातील इंदिरा नगर परिसरात रामनगर पोलिसांनी दारूबंदीविरोधात धडक कारवाई करत एका आरोपीस ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान विक्रीसाठी आणलेली विदेशी दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोपेड असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दारूबंदी पथकाने संबंधित परिसरात नाकाबंदी करून कारवाई केली. यावेळी दुर्गेश साईनाथ मसराम याच्याकडून अंदाजे १० हजार रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोपेडही पोलिसांनी ताब्यात घेतली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे यांच्या नेतृत्वात दारूबंदी पथकातील अंमलदार अविनाश बनसोड, मुकेश वांदिले, विकी अणेराव व मनोज भोमले यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.