ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; महात्मा फुले समता परिषदेचे पंतप्रधानांना निवेदन

Thu 04-Jun-2026,04:35 AM IST -07:00
Beach Activities

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; महात्मा फुले समता परिषदेचे पंतप्रधानांना निवेदन

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची अचूक माहिती उपलब्ध व्हावी, शासकीय योजना व आरक्षणाचा लाभ प्रभावीपणे मिळावा तसेच समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी योग्य धोरणे आखता यावीत, यासाठी जातीनिहाय जनगणना अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ओबीसी समाजाच्या विविध घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी तसेच विकास योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हाध्यक्ष विशाल हजारे, शहराध्यक्ष बंटी खडसे, विक्रांत चौधरी, प्रदीप देशकर, भरत चौधरी, डॉ. अविनाश गवई, प्रदीप कडू, सुधाकर झाडे, अभय पुसदकर, प्रविण बुराडे, संजय फुलंबरकर यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि विकासाच्या संधींचे समान वाटप सुनिश्चित करण्यासाठी जातीनिहाय जनगणना ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.