नाजेमा सय्यद यांचा सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सार्वजनिक सेवेनिमित्त भाजपातर्फे सेवा संकल्प अभियान जनसेवा से राष्ट्रसेवा अंतर्गत अभियान राबविण्यात येत आहे त्यामध्ये 10 ऑक्टोबर रोजी वसमत येथील सूरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह येथे अतिश भैय्या दांडेगावकर मित्र मंडळातर्फे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये शिरड शहापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या नाजेमा सय्यद यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळेस भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे , भाजपा युवा नेता अतिश दांडेगावकर , युवक जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, खोब्रा नरवाडे शिवदास बोर्डवार डॉक्टर मारुती क्यातमवार. देशपांडे.प्रीती जयस्वाल. इतर मान्यवर उपस्थित होते.