आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभुर्णा येथील कृषी क्षेत्रातील कार्यालयाचे उद्घाटन

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर:पोंभुर्णा येथील नवीन कृषी कार्यालयाच्या माध्यमातून कृषी विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम सेवा मिळतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा जयजयकार करण्यासाठी कृषी क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, असे आवाहनही आ.मुनगंटीवार यांनी केले. आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभुर्णा येथील कृषी कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.पोंभुर्णा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आधुनिक आणि देखणी व्हावी यासाठी स्थानिक शेतकरी आणि या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपले म्हणणे मांडले होते. तालुका ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची नवी इमारत व्हावी यासाठी निवेदन दिले. जनसमस्यांना तातडीने सोडवण्यासाठी तत्पर असलेले आ. सुधीर मुनगंटीवारांनी त्याच कार्यक्रमात सुंदर व सुसज्ज इमारत बांधण्याची घोषणा केली होती. केवळ घोषणा करून ते थांबले नाहीत, तर या तालुका कृषी अधिकारी कार्यालय इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यात देत त्यासाठी 249.95 लक्ष रूपयांचा निधीही मंजुर केला. आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते याच सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. त्यामुळे ‘दिला शब्द केला पूर्ण’ याची आ.मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,अधीक्षक अभियंता (विद्युत) पुनम वर्मा,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, तहसीलदार रेखा वाणी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, गटविकास अधिकारी विवेक बेलालवार, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, राहुल संतोषवार, बंडू गोरकार, रवींद्र मरपल्लिवार आदींची उपस्थिती होती.आमदार . सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग कार्य करीत आहे. यासाठी सर्वप्रथम चंद्रपूरचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांच्या प्रगती व उत्पन्न वाढीसाठी कृषी अधिकारी योग्य ते मार्गदर्शन करेल आणि या कार्यालयाच्या माध्यमातून कृषी अधिकारी शेतकरी बांधवांचे मनापासून सेवा करेल.’
बाजार समिती महाराष्ट्रात सर्वोत्तम करण्याचा मानस
शेतकऱ्यांच्या प्रगीतीसाठी मी सदैव पुढाकार घेतला आहे.बल्लारपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीसाठी मान्यता घेतली असून बल्लारपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात सर्वात उत्तम करण्याचा मानस आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी सदैव पाठीशी
पोंभुर्णा तालुक्यामध्ये धडक सिंचन विहीर, मागेल त्याला विहिरी दिल्या. कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे यासाठी मुलमध्ये नवे कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून कृषी क्षेत्राशी संबंधित कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र चंद्रपुरात होत आहे. कृषी क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले आहे. बंधारे, माजी मालगुजारी तलाव, धडक सिंचन विहिरी, मागील त्याला सिचंन विहीर दिल्या, याचा उल्लेख करून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही आ. मुनगंटीवार यांनी दिला.
202 कोटींच्या पीक विम्याचे वाटप
मुंबईमध्ये मूल व पोंभुर्णा तालुक्यातील पिकवलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात विकला जातो. कृषी क्षेत्रामध्ये सामूहिक शेती तसेच पोखराच्या माध्यमातून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पुढील महिन्यापर्यंत धानाचा 1800 कोटी बोनस प्राप्त होणार आहे. शिवाय पोंभुर्णा तालुका येत्या पाच ते दहा वर्षात पोंभुर्णा आणि गोंडपिपरीच्या मध्ये 30 हजार एकरवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, असेही आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. आतापर्यंत 202 कोटींच्या पीक विम्याचे वाटप करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.