संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या थकीत अनुदानासंदर्भात आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची मोर्शी विधानसभेचे आमदार उमेश यावलकर यांनी घेतली भेट
प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
मोर्शी:संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या थकीत अनुदानासंदर्भात आज मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची मोर्शी वरूड विधानसभेचे आमदार उमेश यावलकर यांनी भेट घेऊन मोर्शी व वरुड तालुक्यातील श्रावण बाळ,संजय गांधी योजना थकीत अनुदानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत मे महिन्यापर्यंतचे थकीत अनुदान त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असून हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होण्यासाठी आवश्यक त्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत नाहीत अथवा खाते आधाराशी लिंक नाही, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी,असे निर्देश मंत्री संजय शिरसाठ यांनी दिले.तसेच यासंदर्भात तात्काळ कार्यवाही व आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी आजच्या मुलाखतीत दिले.
Related News
नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती पर युवा: परिवर्तन की आवाज संघटना ने किया माल्यार्पण
6 days ago | Naved Pathan
स्वच्छ भारत’ केवळ फलकांपुरतेच; हिंगणघाट शहरात सार्वजनिक शौचालयांचा तीव्र अभाव
6 days ago | Naved Pathan
भीम आर्मीचा नगरपरिषदेला इशारा : २५ तारखेपर्यंत स्वच्छता न झाल्यास कचरा थेट नगरपरिषदेत टाकणार
7 days ago | Naved Pathan