शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट जाम येथील जागेचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते सुपूर्द

Fri 16-May-2025,02:33 AM IST -07:00
Beach Activities

अब्दुल कदीर बख्श 

वर्धा:आज मुंबई येथे आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटच्या जागेचा सातबारा त्यांच्याकडे सुपूर्द केला वैद्यकीय महाविद्यालयाची जाम येथील जागा हि कृषी विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याकरीता आमदार कुणावार यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता त्याचं अनुषंगाने मागील महिन्यात जाम येथील कृषी विभागाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय पारित झाला होता व जिल्हाधिकारी वर्धा यांनी जागेचा फेरफार करून सदर जागा अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट यांच्या नावाने करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या सदर जागेची फेरफार नोंद झाली असून त्याची प्रत आज आमदार कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सुपूर्द केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून महत्वाचा आणि निर्णायक टप्पा पार पडला आहे आता लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे