आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते 125 लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी दिनांक, १० ऑगस्ट रोजी, भोजन खेडा रोडचे भूमिपूजन केले. अल्लीपूर ते भोजन खेडा हा मार्ग गेल्या २५ वर्षांपासून वर्धा जिल्हापरिषदेमध्ये सतत चर्चेत राहिला तो शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अल्लीपूर भोजनखेडा रोड दुर्लक्षित होता. हजारो शेतकरी या मार्गाचा वापर करतात. अनेकदा या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते मात्र रस्ता पुढे सरकला नाही यावेळी रस्ता पुर्ण होईल असा विश्वास आमदार राजेश बकाने यांनी दिला 125 लक्ष निधीतून या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले याचबरोबर, गावातील नागरी सुविधां फंडातून रोडचेही भूमिपूजन पार पडले.या कार्यक्रमास माजी सरपंच,नितीन चंडणखेडे,माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत चांडणखेडे,भाजपा देवळी विधानसभा प्रमूख राहुल चोपडा,विजय जयस्वाल,उत्तम ढगे,डॉ. टीचकुले,अशोक सुपारे,सतिश काळे यांच्यासह मोठया संख्येने ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.