प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अतिक्रमण नियमानुकुलन कार्यक्रमात २१० पट्ट्यांचे वाटप

Thu 14-Aug-2025,04:18 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकुलन कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते नाट्यगृह, बल्लारपूर येथे २१० पट्ट्यांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदन सिंह चंदेल,जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) हरीश शर्मा, तहसीलदार रेणुका कोकाटे,नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले भूमी अभिलेख विभागाचे देशमुख, शहर अध्यक्ष ॲड. रणांजय सिंह,भाजपा कामगार प्रदेश उपाध्यक्ष अजय दुबे,देवा वाटकर,समीर केने,गुलशन शर्मा,नरींदर सिंग दारी,निलेश खरबडे,वैशाली जोशी,आरती अक्केवार यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी २१० लाभार्थ्यांना पट्टे प्रदान करण्यात आले तसेच विजेचा धक्का बसून मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना धनादेश देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी संगीता उमारे यांनी केले तर प्रास्ताविक राजेश मिश्रा यांनी केले.