एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज गोंदिया येथे संविधान दिन साजरा

अन्य

आमगांव तालुका प्रतिनिधि-  अजय दोनोडे

एम एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज गोंदिया येथे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून तसेच आयुर्वेदाचे देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले आणि त्यानंतर संविधानाचे प्रस्तावनाचे सर्वांनी एकत्र वाचन केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून श्री चौरे सर असिस्टंट प्रोफेसर एनएमडी कॉलेज गोंदिया हे होते.संविधानाचे महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला तसेच संविधान हे फक्त पुस्तकातच नसून त्या आचरणात पण आणा असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विनोद बडोले यांनी केले.डॉक्टर ललित ठाकूर यांनी भारतीय संविधाना व त्यांचे विचार व्यक्त केले.सुजित नरनावरे, साक्षी गवई ,पटले ,भोयर ,अंकिता भगत तसेच इतर विद्यार्थी विद्यार्थिनी इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त भाग घेतला.प्राचार्य जयमाला शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.डॉक्टर देवेंद्र ठाकरे ,डॉक्टर स्वाती लांजेवार ,डॉक्टर सपना शिंगाडे, डॉक्टर प्रमोद गहाणे ,प्रियंका लोणारे आणि इतर शिक्षक महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.