गौशाळेजवळील लॉनमध्ये फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Tue 24-Feb-2026,12:56 AM IST -07:00
Beach Activities

गौशाळेजवळील लॉनमध्ये फटाक्यांवर संपूर्ण बंदी घालण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा, दि. २३ फेब्रुवारी २०२६ : गौ रक्षा हिन्दु दल, वर्धा यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. राधाकृष्ण बजाज गौशाळा चॅरिटेबल ट्रस्ट, चरमालय, नलवाडी रोड, वर्धा येथील गौशाळेला लागून असलेल्या महात्मा लॉनमध्ये होणाऱ्या आतषबाजीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर गौशाळेत सध्या आजारी, अपघातग्रस्त तसेच ताब्यातील अनेक गोवंशांचे उपचार व संगोपन केले जात आहे. फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे गोवंश घाबरून पळापळ करतात, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. तसेच गौशाळा परिसरात सुका चारा, भूसा व अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आतषबाजीमुळे आग लागण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. यामुळे गोवंश, गौशाळेची मालमत्ता तसेच परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

गौ रक्षा हिन्दु दलाने प्रशासनाला नम्र विनंती केली आहे की, गोमातेची सुरक्षा व गौशाळेचे संरक्षण लक्षात घेता गौशाळेजवळ कोणत्याही प्रकारची आतषबाजी करण्यास संपूर्ण बंदी घालण्यात यावी.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित मंगलकार्यालने व लॉन चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी गौ रक्षा हिन्दु दल, वर्धा येथील जिल्हा कार्यकर्ते रोशन पटेल, संकेत श्रीगोड, रोहित दुरगडे, सूरज सोमनाथे, रवि मनोजा तसेच जिल्हाध्यक्ष किशोर सोनी उपस्थित होते.