अर्पण नगरमध्ये संशयास्पद हालचालींमुळे खळबळ, देहविक्रीच्या आरोपांवरून नागरिकांमध्ये तीव्र संताप

Tue 07-Apr-2026,07:35 AM IST -07:00
Beach Activities

अर्पण नगरमध्ये संशयास्पद हालचालींमुळे खळबळ, देहविक्रीच्या आरोपांवरून नागरिकांमध्ये तीव्र संताप

नावेद पठाण मुख्य संपादक (सावंगी मेघे)

सावंगी मेघे : वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील अर्पण नगर परिसरात सुरू असलेल्या संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या तक्रारीनुसार, या भागात कथितरित्या देहविक्रीचा धंदा चालवला जात असल्याचे आरोप समोर आले आहेत.

रहिवाशांचे म्हणणे आहे की, अर्पण नगर लेआउटमध्ये बाहेरील व्यक्तींना बोलावून अनैतिक प्रकार घडवले जात असून त्यामुळे परिसराचे वातावरण बिघडले आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच, परिसरात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे.