मद्यमुक्तीसाठी मोफत राज्यस्तरीय जनजागरण
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली: वसमत मागील ९ दशकांपासून जवळपास दोनशे देशात मद्यमुक्तीसाठी संपूर्ण जगभरात अहोरात्र मोफत कार्य करणाऱ्या ॲल्कोहोलीक्स ॲनोनिमस् विश्वव्यापी संस्थेच्या परभणी फेलोशिपच्या विद्यमाने परभणीतील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या सभागृहात राज्यस्तरीय जनजागरण सभेचे आयोजन विविध सत्रातून दि. १७ रविवारी करण्यात आले आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात, केंद्र शासन पुरस्काराने सन्मानित डॉ. संदीप तांबारे धाराशिव, राज्य शासन पुरस्कारार्थी विशाल अग्रवाल हिंगोली यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जनजागरण सभेत मद्यपाश एक जीवघेणा आजार या विषयावर सकाळी दहा वाजता मार्गदर्शन लाभणार आहे. अल्कोथॉन अंतर्गत, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील निवडक मद्यमुक्त बांधवांचे अनुभवकथन सत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ए. ए. जगण्याचा राजमार्ग, आर्थिक अस्तव्यसतता आणि उपाय आदी विषयांवर विवेचन करण्यात येणार आहे. मद्यपि, अटृल मद्यपिंकरिता मोफत जनजागरण करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाहीत. मद्यमुक्तीच्या शोधात असलेल्या कुटुंबातील सदस्यांचे जनजागरण सभागृहात स्वागत करण्यात येणार आहे. सहभागी मद्यपि आणि मद्यपिंच्या त्रस्त कुटुंबातील सदस्य उपस्थितीबद्दल प्रसिद्धी माध्यमांपासून कमालीची गुप्तता पाळण्यात येणार आहे. जनजागरणातून मद्यपिडीतांना मद्यमुक्तीसाठी प्रेरित करण्यासाठी यथोचित प्रयत्न करण्यात येणार आहे. निव्वळ सेवा तत्वावर कार्यरत ॲल्कोहोलिक ॲनाॅनिमस् वर्तुळाच्या बाहेरील कोणत्याही प्रकारच्या मदतीला स्पष्ट नकार देते. केवळ मद्यमुक्त बांधवांकडून जनजागरणाकरिता स्वेच्छेने आर्थिक ताळमेळ राबविण्यात येते. मोफत उपक्रमासाठी मुकेश जी, सुनील डी, मच्छींद्र जी, संजय आर, महेश डी, विलास के, गणेश ,रामभाऊ, गजानन के, विठ्ठल, हारून आदी परिश्रम घेत आहेत.