लोकजागर अभियान वसमत विधानसभा – टेंभुर्णी सर्कल
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत विधानसभा अंतर्गत टेंभुर्णी सर्कल येथे लोकजागर अभियानाच्या अनुषंगाने बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत मतदार विशेष सखोल पुनर्रचना (SIR) अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक बूथवरील मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी, नवीन मतदारांची वेळेत नोंदणी व्हावी तसेच त्रुटींची दुरुस्ती प्रभावीपणे पार पडावी, यासाठी कार्यकर्त्यांना सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच बूथ पातळीवरील संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने BLA-2 पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग वाढवण्यासाठी आणि तळागाळापर्यंत प्रभावी जनजागृती करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
जिल्हा सरचिटणीस .खोब्रा पाटील नरवाडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष .विजय नरवाडे,
.गणेश कमळू, .ज्ञानोबा काळे, .भुजंगराव चव्हाण, .राजा भालेराव, .विठ्ठल चव्हाण, .रामराव यादव, .सोनवणे काका, .ज्ञानोबा कदम, .देवराव सवंडकर, .माधव सवंडकर, .संजय सवंडकर, .युवराज सवंडकर, दत्ताराव भालेराव,.गोविंदराव चव्हाण, .गंगाधर उकरे, .सुभाष जाधव, .ज्ञानेश्वर, .मारोतराव जाधव, .आबासाहेब सवंडकर, .मुंजाजी रानोबा, .शिवाजी पांचाळ, .भगवान भालेराव, .परसराम सवंडकर, .तुळशीदास सवंडकर, .करण भोसले, गोपाळ भोसले, .प्रभाकर सवंडकर, .संभाजी सवंडकर, .गजानन पपलवाड, .बालाजी सवंडकर, .पंडित भोसले, सोहम सवंडकर उपस्थित होते.