औंढा तालुक्यातील बेरुळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक चा वर्धापनदिन साजरा

Sat 26-Jul-2025,10:42 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : औंढा बेरुळा/25 जुलै हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सिमेवरचे आणि पूर्णा नदीच्या पट्यात हिंगोली जिल्ह्यातील शेवटचे गांव असलेल्या बेरुळा या गांवात विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चौक असून, या चौकात निळा झेंडा डौलाने फडकत असतो.अतिशय संघर्ष करुन बेरुळा येथील बौद्ध उपासक व उपासीकांनी सदर चौकाची स्थापना केली आहे. आज 25 जुलै हा दिवस या चौकाचा वर्धापनदिन होता. हा वर्धापनदिन गांवकरी बौद्ध उपासक व उपासीकांनी उत्साहात साजरा केला. या मंगल प्रसंगी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते, भिमशक्ती चे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके, प्रजाशाहीचा आवाज चे संपादक वैभव धबडगे, रिपब्लिकन युवा नेते राहुल घोडके, साहेबराव काशिदे,दिनेश खाडे आणि ऑल इंडिया पँथर संघटनेचे औंढा तालुकाध्यक्ष मिलिंद जोंधळे इत्यादी मान्यवर पाहुणे उपस्थित होते.यावेळी मिलिंद जोंधळे यांच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भिमशाहीर गौतम इंगोले यांनी केले, आभार साळवे यांनी मानले. तर प्रास्ताविक वैभव साळवे यांनी केले. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा च्या महिला पदाधिकारी त्याचबरोबर दिक्षानंद साळवे, जिवन घोडके, सुनिल दिपके , बालासाहेब साळवे, सुनिल साळवे,वैजंताबाई सुर्य, सुप्रिया घोडके, आशाबाई साळवे व गावांतील बौद्ध उपासक व उपासीकांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.