दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
मुख्य संपदाक नावेद पठाण
वर्धा | वर्धा बसस्थानकासमोर दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.५० वाजताच्या सुमारास दारू पिऊन दुचाकी चालवत असलेल्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच ३२ आर ०५३४ घेऊन मद्यप्राशनाच्या अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ (मद्यप्राशन करून वाहन चालवणे) तसेच कलम ३/१८१ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय भांडेकर, अनिल तिवारी, पोलीस हवालदार सय्यद शब्बीर व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कोहळे यांनी केली.
Related News
चिकनच्या भाजीवरून वाद,मोठ्या भावाने कुऱ्हाडीने वार करून धाकट्या भावाचा खून
7 days ago | Sajid Pathan
नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू,नातेवाईकांकडून हलगर्जीपणाचा आरोप
24-Aug-2026 | Sajid Pathan
शांतीनगरातील ४० वर्षीय महिला बेपत्ता,वर्धा नदीकाठावर चपला आढळल्याने शोधमोहीम सुरु
22-Aug-2026 | Sajid Pathan
मद्यधुंद पिकअप चालकाचा बल्लारपुरात कहर मेडिकल व्यावसायिकाचा मृत्यू,चौघे जखमी
20-Aug-2026 | Sajid Pathan