दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
मुख्य संपदाक नावेद पठाण
वर्धा | वर्धा बसस्थानकासमोर दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.५० वाजताच्या सुमारास दारू पिऊन दुचाकी चालवत असलेल्या एका आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली. आरोपी आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच ३२ आर ०५३४ घेऊन मद्यप्राशनाच्या अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ (मद्यप्राशन करून वाहन चालवणे) तसेच कलम ३/१८१ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय भांडेकर, अनिल तिवारी, पोलीस हवालदार सय्यद शब्बीर व पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कोहळे यांनी केली.
Related News
बल्लारपूरात ११ गोवंश जनावरांची सुटका १३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी अटकेत तर तीन फरार
4 hrs ago | Sajid Pathan
रेल्वेच्या धडकेत सहा महिन्यांच्या मादी बिबट्याचा मृत्यू,वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2 days ago | Sajid Pathan
ऑनलाइन बुक केलेल्या ४५ हजारांच्या मोबाईलऐवजी साबणाच्या वड्या : वरोऱ्यात फसवणुकीची घटना
4 days ago | Sajid Pathan
कर्तव्य बजावताना अपघात, महामार्ग पोलीस अमलदाराचा मृत्यू,दोन मुलींचे पितृछत्र हरपले
14-Oct-2026 | Sajid Pathan