जंतर-मंतरवरील आंदोलनात बल्लारपूरच्या युवा नेतृत्वाचा सहभाग,रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत

Mon 27-Jul-2026,10:12 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : नवी दिल्ली येथील जंतर-मंतरवर आयोजित आंदोलनात बल्लारपूर शहरातील सहा युवा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनातून परतल्यानंतर बल्लारशाह रेल्वे स्थानकावर त्यांचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.

दिल्लीतील आंदोलनात मनीष गोरघाटे, प्रियंका चव्हाण, कशीश वेले, शुभम चिकाटे, छत्रेश बोरकर तसेच आकाश चव्हाण यांनी सहभाग घेतला. विविध मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपल्या उपस्थितीद्वारे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर त्यांच्या आगमनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख कल्पना गोरघाटे, तालुकाप्रमुख मीनाक्षीई गलगट, अंजली बेन बन्सी, किरण बॉबी आणि आशा माझी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक व लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. रेल्वे स्थानक परिसरात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.