आम आदमी पक्षातर्फे शहरात ‘शहीद दिन' साजरा करण्यात आला
 
                                    
                                शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर: 1931 मध्ये या दिवशी शहीद-ए-आझम भगतसिंग,सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली होती.या दिवशी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.त्यानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने बुद्ध नगर वार्डातील टिपू सुलतान चौकात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून शहीद दिन साजरा करण्यात आला.यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद-ए-आझम भगतसिंग,सुखदेव थापर, शिवराम राजगुरू यांचे स्मरण करून शहराध्यक्ष रवि पुप्पलवार म्हणाले की,तरुणांनी शहीदांचा आदर्श सदैव स्मरणात ठेवावा व देशसेवेची प्रेरणा मिळावी.युवकांनी हुतात्म्यांचा आदर्श अंगीकारून देशसेवेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले तसेच जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार व शिक्षण आघाडीचे अध्यक्ष अजयपाल सूर्यवंशी यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नसल्याचे सांगितले.यावेळी शहर CYSS सचिव हर्षद खंडागडे यांनी शहीद-ए-आजम भगतसिंग यांच्या अखेरच्या पत्राचे वाचन केले तर CYSS शहर सह-संघटन मंत्री प्रबोधी ताकसांडे यांनी शहीद दिनानिमित्त निरोप दिले तर कार्यक्रमाचे संचालन युवा उपाध्यक्षा स्नेहा गौर यांनी केले.शहराध्यक्ष रवि पुप्पलवार व जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांनी शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मेंबती प्रज्वलन करून व सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर CYSS समितीचे मोठे योगदान होते.या कार्यक्रमास आम आदमी पार्टी बल्लारपूर शहरातील पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            