पुण्यात राज्यस्तरीय वूशू स्पर्धा; हिंगणघाटच्या ७ खेळाडूंची निवड

Fri 20-Feb-2026,04:58 AM IST -07:00
Beach Activities

पुण्यात राज्यस्तरीय वूशू स्पर्धा; हिंगणघाटच्या ७ खेळाडूंची निवड

नावेद पठाण मुख्य संपादक 

पुणे येथे आयोजित महाराष्ट्र अमैच्योर वूशू संघ यांच्या वतीने १३ वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर व ज्युनियर वूशू अजिंक्यपद स्पर्धा दि. २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी हिंगणघाट येथील B C C Sporting Club च्या ७ खेळाडूंची राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे –

तेजस्विनी निमसारकर, अंतरा सिद्धार्थ मून, प्रांजली राजू डंभारे, सोहम विनोद जनबंधू, वरुण राजू गंधे, अफाना जुबेर शेख तसेच परवेज महफूज अली.

हिंगणघाटमधील या होतकरू व प्रतिभावान खेळाडूंनी या यशापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि सातत्यपूर्ण मेहनत घेतली आहे. त्यांच्या या यशामागे मार्गदर्शक नदिम शेख, संघप्रशिक्षक उल्लास वाघ सर, नीलेश लाजुरकर सर, अभिजित सिंह सर तसेच संपूर्ण प्रशिक्षकवर्ग यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पूर्ण समर्पणाने तयार केले.

या प्रेरणादायी प्रवासात खेळाडूंचे पालक, कुटुंबीय तसेच हिंगणघाट शहरातील क्रीडाप्रेमी व नागरिक यांचे सहकार्य, प्रोत्साहन आणि आशीर्वादही तितकेच उल्लेखनीय ठरले आहे.

हिंगणघाट शहराच्या वतीने सर्व निवड झालेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा