वसमत येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी मोर्चात ॲड. अमन आंबेडकर यांचा एल्गार

Tue 27-Oct-2026,05:35 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली.

हिंगोली : वसमत शहरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात रिपब्लिकन सेनेचे युवा नेते ॲड. अमन आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना ॲड. अमन आंबेडकर म्हणाले की, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घाट हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या विरोधात आहे. सरकार ५८ जातींना एकमेकांच्या विरोधात लढवण्याचे षडयंत्र रचत असून आंबेडकरी समाज हे कदापी खपवून घेणार नाही.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे व त्यासाठी नेमलेली समिती बरखास्त करावी, सरकारी व निमसरकारी क्षेत्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत, ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या मोर्चात वसमत तालुक्यातील बौद्ध, मातंग, चर्मकार समाजासह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.