शेतकऱ्यांना हेक्टरी रु.50000/- मदत मिळणे व कर्जमाफी याकरिता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:- वसमत येथील सरपंच उपसरपंच यानी मागणी केली आहे कीं ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी रु.५००००/-मदत जाहिर करणे व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देणे , या वर्षीं अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, जिथे कुठे पाऊस पडत आहे सदर पाऊस ढगफुटीसारखा पडत आहे. त्यामुळे शिवारातील नदी नाल्यांना पुर येऊन पुराचे पाणी शेतात येऊन जमीनी खरडून गेल्या आहेत. शेतातील अवस्था ही अत्यंत दुर्देवी असून कोणतेही पीक शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे कोणतेही पंचनामे त करता सरसकट शेतकन्यांना हेक्टरी रु.५००००/- मदत जाहिर करण्यात यावी, त्याचप्रमाणे नैसर्गीक दुष्चक्रामुळे शेतकरी संकटात असून कर्ज बाजारी असून आर्थिक संकटात आहे, दैनंदिन कुटुंबाचा प्रपंच, मुलांचे शिक्षण, लग्न, वैद्यकिय उपचारासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाच्या विवचनेत राहून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. याच मानसिकेतून तो टोकाचे पाऊल कधी उचलेल याची शाश्वती नाही. आपल्या सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊ केली परंतु अद्याप कर्ज माफी दिलेली नाही. त्यामुळे सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे व आज रोजीची अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था पाहता शेतकन्यांना सरसकट कर्ज माफी अत्यावश्यक आहे.
तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करन्यात येते असे निवेदन देण्यात आले आहे,ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी रु.५००००/- मदत जाहिर करण्यात यावी तसेच शेतकन्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी.