शिरूड (अल्लीपुर) शिवारात अजगरास दिले जीवनदान

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:दिनांक २४/०९/२०२५ रोजी सकाळी महादेवराव काटकर रा . शिरूड यांच्या शेतात कुंपणाच्या तारात अडकलेल्या अजगराची माहिती काटकर यांनी जीवरक्षक फाऊंडेशन चे सदस्य सर्पमित्र सागर शेंडे व सर्पमित्र भाविक कोपरकर यांना दिली . माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पाहनी केली असता तिथे ५ ते ६ फूट अजगर आढळून आला . सर्पमित्रांनी अत्यंत कुशलता आणि शिताफीने तो अजगर जेरबंद केला . व वनविभाग कर्मचारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत तो वनक्षेत्र आजंती येथे पर्यावरणात विलिन करण्यात आला. परीसरात कुठेही साप दिसल्यास
जीवरक्षक फाऊंडेशन हिंगणघाट हेल्पलाईन नंबर: 88063 01295/9309386988 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
Related News
शेतकऱ्यांना हेक्टरी रु.50000/- मदत मिळणे व कर्जमाफी याकरिता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
25-Sep-2025 | Sajid Pathan
*कोटेश्वर येथे जागतिक नदी दिन साजरा – वर्धा नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
24-Sep-2025 | Arbaz Pathan
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची आ. राजेश बकाने यांच्या कडून पाहणी
14-Sep-2025 | Sajid Pathan
खुरसापार शिवारातील शेतकरी भयभीत वनविभागाच्या ऑफिसमध्ये केला तीन तास ठिय्या आंदोलन,
13-Sep-2025 | Sajid Pathan