नागठाणा शिक्षण व क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचा पहिला उपक्रम ‘महाबळा’ गावापासून सुरू
नागठाणा शिक्षण व क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचा पहिला उपक्रम ‘महाबळा’ गावापासून सुरू
वर्धा | मुख्य संपादक नावेद पठाण
नागठाणा शिक्षण व क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्था, वर्धा यांच्या वतीने संस्थेचा पहिला सामाजिक व शैक्षणिक उपक्रम दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळा गावापासून सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी निशुल्क जनरल नॉलेज पेपर, विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तसेच करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी प्रा. प्रविण सराटे (संचालक, नागठाणा करिअर अकॅडमी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वर्धा) यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी, अभ्यासपद्धती तसेच करिअरच्या विविध संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
सामाजिक मार्गदर्शक म्हणून श्याम वलके यांनी उपस्थितांना योग्य दिशा व प्रेरणा दिली. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. सोनम ताई व बबिता ताई यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे महाबळा येथे हे शिबिर घेणे शक्य झाले. संस्थेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व व्यवस्थापनासाठी श्याम वलके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजउन्नतीचा उद्देश साध्य होत असल्याचे संस्थेने नमूद केले.