संविधान चौकात शिवजयंती उत्साहात साजरी
संविधान चौकात शिवजयंती उत्साहात साजरी
वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधि युसूफ पठाण वर्धा
वर्धा, १९ फेब्रुवारी २०२६ वर्धा जिल्हा चालक-मालक ऑटो युनियन, शाखा सिंदी (मेघे) यांच्या वतीने संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भीम आर्मी, वर्धा जिल्हाध्यक्ष प्रदीप (रावण) कांबळे उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद खंडारे व अमोल तामगाडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपल्या मनोगतात त्यांनी शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आदर्श आचरणात आणण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला ऑटो चालक, युनियनचे पदाधिकारी तसेच सिंदी (मेघे) येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑटो युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.