UPSC परीक्षेत प्रज्वल नासरे यशस्वी; खासदार अमर काळे यांच्याकडून अभिनंदन
UPSC परीक्षेत प्रज्वल नासरे यशस्वी; खासदार अमर काळे यांच्याकडून अभिनंदन
ठाणेगाव, ता. कारंजा (घा.), जि. वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण
संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत कारंजा (घा.) तालुक्यातील ठाणेगाव येथील प्रज्वल नासरे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत भारतीय महसूल सेवेत (IRS) स्थान मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशानंतर खासदार अमर काळे यांनी दिल्ली येथे प्रज्वल नासरे यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत समाजासाठी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने काम करण्याचा संदेश दिला.
प्रज्वल नासरे यांच्या या यशामुळे कारंजा (घा.) तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Related News
अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांची भेट
01-Aug-2026 | Sajid Pathan
जंतर-मंतरवरील आंदोलनात बल्लारपूरच्या युवा नेतृत्वाचा सहभाग,रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत
27-Jul-2026 | Sajid Pathan
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर १४ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सत्याग्रह
13-Jul-2026 | Sajid Pathan
मराठी अस्मिता कोचिंग क्लासेस ने घडवले हजारो यशस्वी विद्यार्थी,वसमत शिक्षण क्षेत्रात निर्माण केला नवा इतिहास.
06-Jul-2026 | Sajid Pathan
मॉन्टफोर्ट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत : आनंदमय वातावरणात शैक्षणिक वर्षाची सुरुवात
03-Jul-2026 | Sajid Pathan