देशभरात साजरी ईद; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून शुभेच्छा

Sat 21-Mar-2026,09:53 PM IST -07:00
Beach Activities

देशभरात साजरी ईद; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून शुभेच्छा

हिंगणघाट : प्रतिनिधी – नदीम शेख

हिंगणघाट देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी हिंगणघाट शहरातील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी हिंगणघाट येथील डंकिन रोड कब्रस्तान चौक येथे सकाळी ९.०० वाजता आयोजित कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे व तालुकाप्रमुख मनीष देवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा देत समाजात एकता, बंधुभाव व शांतता राखण्याचे आवाहन केले.

यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष श्रीधर कोटकर, माजी नगरसेवक शंकर मोहमारे, गजानन काटोले, हिरामण आवारी, सचिन पोटदुखे, सुरेश गायकवाड, अमोल वादाफळे, नितीन वैद्य, दिलीप वैद्य, गणेश वडुले, बलराज डेकाटे, नईम खान, फिरोज खान, राहुल मोहितकर, भोला ठाकूर, करण भोयर, निलेश भगत, उमेश धोबे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून सामाजिक एकता व सौहार्द वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.