खालिद खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यात साजरी ईद; ‘ईद बंदोबस्त’चे कौतुक

Sat 21-Mar-2026,10:00 PM IST -07:00
Beach Activities

खालिद खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाण्यात साजरी ईद; ‘ईद बंदोबस्त’चे कौतुक

प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा 

वर्धा : ईद-उल-फितरच्या पावन निमित्ताने वर्धा शहर पोलिस ठाण्यात आपसी बंधुभाव व सांप्रदायिक सौहार्दाचे प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी खालिद खान यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक व युवकांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन पोलिस प्रशासनासोबत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.

यावेळी खालिद खान यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) यांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सणाच्या काळात शहरात शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट बंदोबस्ताचे त्यांनी कौतुक केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे व सेवाभावामुळेच नागरिकांना शांततेत व आनंदात ईद साजरी करता आली, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात डॉ. झाकिर हुसेन कॉलनीतील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व समाजात बंधुभावाचा संदेश दिला. यावेळी झीशान अली, झीशान शेख, रैयान शेख, अयाज खान, अल्फैज कुरेशी, उजैर शेख आदींसह इतर युवक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी समाजात शांतता, एकता व आपसी सौहार्द अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. खालिद खान म्हणाले की, वर्धा शहर आज देशासमोर एकता व बंधुभावाचे आदर्श उदाहरण म्हणून पुढे येत आहे. पोलिस प्रशासनानेही या उपक्रमाचे स्वागत करत सर्व युवक व नागरिकांचे आभार मानले.