आंबेडकर जयंतीनिमित्त क्षितिज कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडून संविधान प्रतींचे वितरण
आंबेडकर जयंतीनिमित्त क्षितिज कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडून संविधान प्रतींचे वितरण
( नावेद पठाण मुख्य संपादक )
कारंजा (घाडगे) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येथील क्षितिज कॉम्प्युटर एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडून विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतींचे मोफत वितरण करण्यात आले.
या निमित्ताने इन्स्टिट्यूटच्या परिसरात सकाळी ११ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक विलास दुपारे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कु. रुपाली ताकसांडे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावे यासाठी एक दिवसीय संविधान वाचन उपक्रम राबविण्यात आला तसेच संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. “महिलांनी आपले हक्क मिळवण्यासाठी संविधानाचे वाचन करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन संस्थेच्या संचालिका शुभांगी दुपारे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कु. भारती बरधे यांनी केले, तर आभारप्रदर्शन कु. श्रुती बरधे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. सपना येरपुडे व कु. शुमायला पठाण यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधान पाहण्याची व वाचनाची संधी मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.